
तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांचा 91 वा जयंती दिन उद्या, गुरुवार 6 जानेवारी रोजी आहे. त्यानिमित्त स्व. माँसाहेबांना शिवतीर्थावर आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे खोपोली येथील रमाधाम येथेही भजन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे माँसाहेबांच्या ममता दिनानिमित्त दरवर्षी शिवतीर्थावर होणारा सुगम संगीत तसेच भजनाचा कार्यक्रम यंदा होणार नसल्याचे स्मारक समितीकडून सांगण्यात आले आहे. तसेच राज्य सरकारच्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करूनच माँसाहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे खोपोली येथील रमाधाम येथे माँसाहेबांच्या ममता दिनानिमित्त भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती रमाधामचे अध्यक्ष चंदूमामा वैद्य यांनी दिली.
























































