
तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांचा 95 वा जन्मदिन म्हणजेच ‘ममता दिन’ मंगळवार, 6 जानेवारी रोजी आहे. यानिमित्त मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत शिवतीर्थ येथे स्व. सौ. मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समितीच्या वतीने सुगम संगीत आणि भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
दादरमधील शिवतीर्थावर माँसाहेबांच्या पुतळय़ाजवळ सकाळी 7 वाजल्यापासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पहिल्या सत्रात श्री सिद्धिविनायक सुगम संगीताचे गुणी कलाकार रविराज नर, राजा कदम, हर्षदा वेल्हाळ, स्मिता तायशेटे, सुहास जयवंत, सचिन नवले आदी भक्तिगीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. कार्यक्रमाच्या दुसऱया सत्रात दादर येथील आर्यदुर्गा महिला भजन मंडळ आणि दैवज्ञ हितवर्धक महिला भजन मंडळ या संस्थेच्या वतीने भजन गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे, अशी माहिती स्व. सौ. मीनाताई ठाकरे स्मृती स्मारक समिती, मुंबईच्या वतीने देण्यात आली आहे.































































