
उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एक व्यक्ती बाईक खरेदी करण्याच्या बाहाण्याने आला होता. यावेळी टेस्ट ड्राईव्हसाठी तो बाईकवर बसला आणि क्षणार्धात बाईक घेऊन लंपास झाला. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडिवर व्हायरल झाला असून त्या संबंधित व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण मेरठच्या एका शोरूमध्ये बाईक घेण्याच्या बहाण्याने गेला होता. तेथे त्याने बाईक मालकाला सांगितले की तो एक गाडी खरेदी करण्याचा विचार करत आहे. मात्र त्याआधी त्याला टेस्ट ड्राइव्ह करायची आहे. त्यामुळे मालकाने त्याच्यावर विश्वास ठेवून, त्याला टेस्ट ड्राइव्हसाठी बाईक दिली. आणि काही सेकंदातच तो तरुण बाईक घेऊन निघून गेला. यानंतर पण बराच वेळ झाला तरी तो परतला नाही. तेव्हा मालकाला त्याचा संशय आला.
मेरठ में टेस्ट ड्राइव के बहाने ये टोपीवाले जनाब बाइक ही लेकर फुर्र हो गए। बाइक मालिक इंतजार करता रहा कि ग्राहक लौटेगा लेकिन न ग्राहक लौटा न बाइक मिली, अब पुलिस इन्हें सीसीटीवी में देखकर तलाश रही है। pic.twitter.com/SzYkm33GtM
— shalu agrawal (@shaluagrawal3) September 20, 2025
मालकाने लगेचच त्या तरुणाचा शोध घेण्यास सुरूवात केली.मात्र कुठेच त्याचा पत्ता लागला नाही. त्यामुळे मालकाने लगेचच पोलिसात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने शोरूम बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचे फोटोवर तपास सुरू केला आहे.