23 ऑगस्ट रोजी कोकण रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

23 ऑगस्ट रोजी सकाळी 07:30 ते 10:30 या वेळेत रत्नागिरी – वैभववाडी रोड विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी तीन तासांचा मेगाब्लॉक करण्यात येणार आहे.

रेल्वे सेवेवर होणारे परिणाम होणार आहे. गाडी क्र. 11003 दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसचा प्रवास 23/08/2023 रोजी सुरू होणारा रोहा – रत्नागिरी विभागादरम्यान 02:30 तासांसाठी नियमित केला जाईल. गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेसचा प्रवास 22/08/2023 रोजी सुरू होणारा उडुपी – कणकवली विभागादरम्यान 03:00 वाजता नियमित केला जाईल. गाडी क्र. 10106 सावंतवाडी रोड – दिवा जं. 23/08/2023 रोजी सुरू होणारा एक्सप्रेस प्रवास सावंतवाडी रोड – कणकवली विभागादरम्यान 30 मिनिटांसाठी नियमित केला जाईल.