
सामना ऑनलाईन । मुंबई
पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते माहीम स्थानकादरम्यान आज जंबोब्लॉक घेण्यात येणार आहे. तर मध्य रेल्वेवर ठाणे-कल्याण मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक नसल्याने या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ब्लॉकमुळे पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील वाहतूक 20 ते 25 मिनिटे उशीराने होणार आहे. पायाभूत सुविधा, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळ दुरुस्ती आणि इतर कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते माहीम स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वेळेत जंबोब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात लोकल वाहतूक अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. या काळात महालक्ष्मी, प्रभादेवी, माटुंगा रोड या स्थानकांवर लोकल थांबणार नाही.
मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान डाऊन धीम्या मार्गावर ओव्हरहेड वायर आणि सिग्नलसह इतर अन्य इतर कामांसाठी सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक काळात डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात लोकल कळवा, मुंब्रा आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबणार नाहीत. तसेच मध्ये रल्वेकडून ने दिवा ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळातील लोकल फेऱ्या अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. या काळात कळवा, मुंब्रा स्थानकात लोकल थांबणार नाही.




























































