चिखलीत महाआरोग्य शिबीरामध्ये 150 तज्ञ डॉक्टरांचे पथक करणार तपासणी

196

सामना प्रतिनिधी । चिखली (बुलढाणा)

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा केशव सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय कोठारी यांच्या संकल्पनेतुन रविवार ११ ऑगस्ट रोजी संपन्न होत असलेल्या स्व. भाऊसाहेब फुंडकर जनआरोग्य महाशिबीराची तयारी अंतिम टप्यात आली असून शिबीराची तयारी पूर्ण झाली आहे. जवळपास एक लाख रुग्ण या शिबीरात सहभागी होतील अशी पूर्वतपासणी आरोग्य शिबीरावरुन दिसून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून व पालकमंत्री ना. डॉ. संजय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या स्व.भाऊसाहेब फुंडकर जनआरोग्य शिबीराच्या पुर्वतपासणीला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे. २७ जुलै पासून चिखली मतदार संघातील सर्व गांवामध्ये प्राथमिक तपासणी शिबीर राबविण्यात आले असून याचा समारोप ११ ऑगस्ट रोजी चिखली येथील आदर्श विद्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या महाशिबीराने होणार आहे.

या महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन आदर्श विद्यालय परिसरात ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख उपस्थितीमध्ये विदर्भ वैधानिक महामंडळाचे अध्यक्ष ना. चैनसुख संचेती, गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खासदार प्रतापराव जाधव, भाजपा जिल्हा प्रभारी खासदार रक्षाताई खडसे, आमदार रामदास आंबटकर, आमदार शशिकांत खेडेकर, आमदार संजय रायमुलकर, आमदार आकाश फुंडकर, जि.प. अध्यक्षा उमाताई तायडे, सागर फुंडकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

११ ऑगस्ट रोजी चिखलीच्या आदर्श विद्यालयात सकाळी ९ वाजेपासून महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये स्त्रिरोग तज्ञ डॉ. मंजु जिला, (संभाजीनगर), डॉ. प्रकाश गुप्ता (बुलढाणा), नेत्रतज्ञ डॉ. अभिजीत आगरे (पुणे), डॉ. विकास बाहेकर (बुलढाणा), डॉ. सुभाष जोशी (बुलढाणा), हृदयरोग तज्ञ डॉ. रोपळेकर (संभाजीनगर), मुत्ररोग तज्ञ डॉ. आदित्य येळेकर (संभाजीनगर) मेडीसिन डॉ. मनिष पेंडसे (मुंबई), डॉ. छाजेड (बुलढाणा), अस्थिरोग तज्ञ डॉ. गौरव कानडे (मुंबई), कर्करोगतज्ञ डॉ. राजस पटेल (मुंबई), बालरोगतज्ञ डॉ. हिरे (बुलढाणा), सि.व्हि.टी.एस. डॉ. यतिंद्र अष्टपुत्रे (संभाजीनगर) त्वचारोग तज्ञ डॉ. आशिष मेहता, डॉ. काळे, प्लास्टीक सर्जन डॉ. अभय पाटील, नेप्रâोलॉजी डॉ. कोरपे (अकोला), मानोसपचार तज्ञ डॉ. आंबेकर (जालना), डॉ. प्रणद जोशी (नांदेड) कान-नाक-घसा तज्ञ डॉ. नारखेडे, डॉ. केवट या तज्ञ डॉक्टरांसह वेगवेगळ्या विभागातील डॉक्टरांची चमु त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टर्स देखील आपली सेवा देणार आहेत. या उद्घाटन सोहळ्याला बुलढाणा जिल्ह्यातील भाजपाचे सर्व आघाड्यांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. या शिबीरामध्ये सर्व नेत्ररोग, हृदयरोग, अस्थिरोग उपचार, बालरोग, स्त्रीरोग, यासोबतच विविध विकारांवर औषधोपचार करण्यात येणार असून आवश्यकता भासल्यास पुढील उपचारासाठी रुग्णाला मदत करण्यात येणार आहे तरी या महाआरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन अ‍ॅड. विजय कोठारी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या