आनंदवार्ता! स्टाफ सिलेक्शन कमिशनची ‘मेगाभरती’, देशभरात 12 हजार 256 जागा भरणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) मार्फत देशभरात मेगाभरती केली जाणार आहे. एसएससीमार्फत सीजीएलच्या 12 हजार 256 जागांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पात्र उमेदवार 22 जून 2026पर्यंत ऑनलाईन अर्ज भरू शकतील. टियर-1ची परीक्षा ऑगस्ट 2026 रोजी तर टियर-2ची परीक्षा डिसेंबर 2026 रोजी घेतली जाईल. भरती संबंधी सविस्तर माहिती https://ssc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.

शैक्षणिक पात्रता काय…

असिस्टंट ऑडिट ऑफिसर पदासाठी पदवीधर, राज्याच्या प्रादेशिक/अधिकृत भाषेतील ज्ञान असणे आवश्यक आहे. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि 12वीत गणितामध्ये किमान 60 गुण आवश्यक. स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेटर ग्रेड-2 पदासाठी सांख्यिकी, गणित, अर्थशास्त्र, लोकसंख्याशास्त्र, लोकसंख्या अभ्यास, संक्रिया संशोधन, माहिती तंत्रज्ञान, संगणक शास्त्र, संगणक अभियांत्रिकी, संगणक तंत्रज्ञान, संगणक उपयोजन, डेटा विज्ञान किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता यांपैकी कोणत्याही विषयातील पदवी. तर बाकीच्या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

कोणकोणती पदे उपलब्ध

असिस्टंट ऑडिट ऑफिसर, असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर, इंस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स, इंस्पेक्टर (सेंट्रल एक्साईज), इंस्पेक्टर (एक्झामिनर), असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर, सब इंस्पेक्टर, एक्झिक्युटिव असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, डिविजनल अकाउंटेंट, सब इंस्पेक्टर/ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर, स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टीगेटर ग्रेड-2, ऑफिस सुपरिंटेंडेंट, सेक्शन हेड, ऑडिटर, अकाउंटेंट, अकाउंटेंट/ज्युनियर अकाउंटेंट, पोस्टल असिस्टंट/सॉर्टिंग असिस्टंट, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/उच्च श्रेणी लिपिक, सिनियर अ‍ॅडमिन असिस्टंट, टॅक्स असिस्टंट, सब-इंस्पेक्टर.