मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

मध्य रेल्वेकडून आज, रविवारी माटुंगा-मुलुंड अप-डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर पनवेल-वाशीदरम्यान दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 या कालावधीत ब्लॉक घेतला आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱया डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यानुसार सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत पनवेल येथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी जाणाऱया अप हार्बर मार्गावरील लोकल आणि सीएसएमटीहून येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेलच्या दिशेने जाणाऱया लोकल गाडय़ा बंद असणार आहेत