मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नाही,हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
western-railway-local
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तर हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्ये रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान रविवारी घेण्यात येणारा ब्लॉक मध्य रेल्वेने रद्द केला आहे. मात्र, हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकांदरम्यान सकाळी 10.30 ते दुपारी 4.30 या वेळेत मोगाब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला ते पनवेल स्थानकादरम्यान काही फेऱ्या सुरू ठेवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.