आज पश्चिम, मध्य व हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 11 ते 4 दरम्यान या मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगादरम्यान सकाळी 11.10 ते 3.40 दरम्यान स्लो मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळे या मार्गावरील सर्व ट्रेन मुलुंड ते माटुंगादरम्यान फास्ट मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील सर्व गाड्या 10 ते 15 मिनिटे उशिराने धावणार आहेत.

हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वांद्रे व सीएसएमटी ते चुनाभट्टी या दरम्यान 11.40 ते 4.10 दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. या दरम्यान या मार्गावरील अप व डाऊन मार्गावरील सेवा पूर्णपणे बंद राहणार आहेत.

पश्चिम मार्गावर सांताक्रूझ ते माहिम दरम्यान 10.35 ते 15.45 या पाच तासांसाठी जंबोब्लॉक घेण्यात आला आहे. अप व डाऊन जलद मार्गावर सिग्नल व ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या पाच तासांसाठी या मार्गावरील सेवा खंडीत करण्यात येणार आहे.