
पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी घेण्यात आलेल्या जम्बो ब्लॉकमुळे लोकल वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडले. अप आणि डाऊन धिम्या मार्गावर पाच तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. ब्लॉक काळात चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व धिम्या लोकल गाडय़ा जलद मार्गावर वळवण्यात आल्या. त्यामुळे धिम्या गाडय़ांबरोबरच जलद गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याने त्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला.




























































