
मेघालयमध्ये एका कारला भीषण आग लागली. या आगीत माजी मुख्यमंत्री मावलोंग यांचे सुपुत्र फर्डिनँड बंशान लिंगदोह यांचा होरपळून मृत्यू झाला.
फर्डिनँड बंशान लिंगदोह हे केंद्रीय कृषी विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडीमध्ये फर्डिनँड यांचा मृतदेह गाडीत सापडला. शिलॉंग गुवाहाटी राष्ट्रीय महामार्गावर ही गाडी उभी होती. या गाडीला आग कशी लागली याचे कारण अद्याप कळालेले नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत.




























































