मेहकर मतदार संघात पाच कोटी रूपयांची विकास कामे होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मेहकर

शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून मेहकर विधानसभा मतदार संघात पाच कोटी रूपयांची विकास कामे होणार आहेत. ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी शासनाच्या गावांतर्गत मुलभूत सुविधा पुरविणे योजनेअंतर्गत शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली मेहकर व लोणार तालुक्यातील ग्रामीण भागातील विकास कामांना निधी मिळण्याबाबत सविस्तर यादी ग्रामविकास विभागामार्फत शिवसेनेचे ग्रामविकास राज्यमंत्री दादासाहेब भुसे यांचेकडे पाठवली होती त्यास मंजुरात मिळून अंदाजे पाच कोटी रू निधी जि प कडे पाठविण्यात आला आहे.

या विकास कामात मेहकर तालुक्यात लोणी गवळी ,(10 लाख ),दे.साकर्शा(10 लाख ),दादुलगव्हाण(6 लाख )ब्रम्हपुरी (6 लाख ) सुकळी (6 लाख ) दादुलगव्हाण फाटा (10 लाख)चिंचोली बोरे (6 लाख)बोरी (8 लाख ) पिंपळगाव उंडा (6 लाख)पिं.उंडा गजानन महाराज मंदिर( 6 लाख )मोहना बु (6 लाख )अकोला ठाकरे(6 लाख )उसरण (9 लाख )मारोती पेठ(6 लाख )नायगाव दत्तापूर(10 लाख)कासारखेड दलित वस्ती (6 लाख )हिवरा बु( 6लाख लाख )कळंबेश्वर(6 लाख )मोसंबेवाडी(10 लाख) देऊळगाव माळी(6 लाख )खंडाळा ( 7लाख )शेलगाव देशमुख धनगर वस्ती (7 लाख )नागझरी खु(5 लाख )शहापूर(7 लाख )डोणगांव (जैन समाज व माळी समाज 12 लाख )जानेफळ (10लाख)घाटनांद्रा बंजारा समाज (5 लाख )व बेलगांव येथे बंजारा समाज करिता (6 लाख ) पांगरखेड (8लाख) बेलगाव दलित वस्ती (6 लाख) लोणार तालुक्यात अंजनी(10लाख)सुलतानपूर (5 लाख )राजणी(6 लाख )पिंपळखुटा(7 लाख ) देऊळगाव वायसा(6 लाख)गुंधा(5 लाख) खुदनापूर (6 लाख ) येथे सभामंडप होणार आहे

तर सिमेंट रस्त्याची कामे ज्या गावात होत आहे त्यात मेहकर तालुक्यातील पिंप्रीमाळी (7लाख)अकोला ठाकरे (7 लाख ) घाटबोरी (7 लाख) गणपूर(5 लाख )साब्रा(5लाख) लांडेवाडी(6 लाख ) सुकळी (6लाख)मोहना (शेंदला 5 लाख ) गोमेधर(6 लाख) चायगाव (5लाख)वडगावमाळी (5 लाख) सावंगीमाळी (5लाख) फर्दापूर(5 लाख)शेलगाव देशमुख(5 लाख)डोणगाव (6 लाख) सारशीव (5 लाख) बरटाळा(5 लाख) मुंदेफळ(7लाख) पेनटाकळी(6 लाख)शेंदला (6 लाख)लव्हाळा(7 लाख)वरदडा(5 लाख)वडाळी(6 लाख)थार(5 लाख)तर लोणार तालुक्यातील धाड(5 लाख)वढव (7 लाख)बागुलखेड(5लाख)गंधारी(6 लाख)खुरमपूर(5 लाख)धायफळ(5 लाख)देऊळगाव कुंडपाळ(5 लाख)येवती(5 लाख)पळसखेड(6 लाख)मातरखेड(5 लाख)येथे सिमेंट रस्ते होणार आहेत. सोबतच गायखेड येथील शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण( 10लाख)खामखेड येथे सभामंडप व सिमेंट रस्ता(5 लाख)परतापूर येथे संरक्षक भिंत व सभामंडप(6 लाख)आरेगाव येथे स्मशानभूमी शेड व सिमेंट रस्ता(5लाख)दे.साकर्शा येथे मुस्लीम कब्रस्थान (5 लाख) व जयताळा येथे लहान पुलाचे बांधकाम(5 लाख)आदी विकास कामे होणार आहेत.