
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्याच्या महत्त्वाचा दिवस असतो. तो संस्मरणीय ठरावा यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. त्याची तयारीही खूप दिवसांपासून करत असतात. लग्नाची निमंत्रण पत्रिका, सजावट, खाणंपिणं, वधूवरांचा पेहराव या बाबी खास ठराव्या असे वाटत असतं. अशातच एका बंगाली लग्नातील मेन्यूकार्ड चर्चा रंगली आहे. लग्नात मेन्यूकार्ड एका लाकडी फूटपट्टीवर छापण्यात आलं आहे. काय आश्चर्य वाटलं ना… एका बंगाली लग्नात अशी भन्नाट शक्कल लढवण्यात आली.
क्रिएटिव्हिटीचा अनोखा नमुना असलेले मेन्यूकार्ड काही वर्षांपूर्वी झालेल्या एका विवाहाचे आहे. फुटपट्टीवर लग्नातील पदार्थ लिहिलेले आहेत. सिलीगुडी येथील सुष्मिता आणि अनिमेष यांच्या लग्नातील हे कार्ड असल्याचे फूटपट्टीवरील अक्षरांवरून दिसत आहे. खूप वर्षांनी हे अजब कार्ड व्हायरल झाले आहे. ते करणाऱयाच्या क्रिएटिव्हिटीचे लोक कौतुक करत आहेत.



























































