आकाशकाणीतही ‘मी टू’ धडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

आकाशवाणीतील महिला कर्मचाऱ्यांनी ‘मी टु’ मोहिमेत लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, यासाठी केंद्रीय महिला आणि बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी माहिती प्रसारणमंत्री राज्यवर्धन राठोड यांना पत्र लिहिले आहे.

आकाशवाणीत काम करणाऱ्या काही महिला कर्मचाऱ्यांनी आणि वृत्तनिवेदिकांनी लैंगिक छळाच्या तक्रारी नोंदकल्या आहेत. देशभरात ऑल इंडिया रेडिओच्या कार्यालयातून या संदर्भातील तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेतली जाऊन त्यानंतर या संदर्भात कारवाई केली जावी म्हणून मनेका गांधी यांनी हे पत्र लिहिले आहे. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी काटेकोर व्यवस्था तयार करावी. जेणेकरून कोणाही महिला कर्मचाऱ्याला असा अनुभव घ्यावा लागणार नाही, असे मनेका गांधी यांनी पत्रात नमूद केले आहे. यानंतर आता राज्यवर्धन राठोड काय कारवाई करणार, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.