धक्काबुक्की, गर्दीतून सुटका; मीरा-भाईंदरला जाण्यासाठी दक्षिण मुंबईतून मेट्रो पकडा

फाईल फोटो

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतच्या पश्चिम उपनगरांना जोडणाऱया 10.5 कि.मी.लांबीच्या दहिसर-मीरा-भाईंदर मेट्रो -9 आणि अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टर्मिनल -2)मेट्रो -7 अ या दोन मेट्रो मार्गांना राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे उपनगरीय रेल्वेच्या गर्दीतून धक्काबुक्की खात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट दक्षिण मुंबईतून मेट्रो पकडून मीरा रोड-भाईंदरला जाणे शक्य होणार आहे. या दोन प्रकल्पांचा प्रस्ताव नगर विकास विभागाला सादर करण्यात आला होता. नगर विकास विभागाने त्यास मान्यता दिली आहे. सुमारे 6,607 कोटी रुपये खर्च करून हे दोन्ही प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. 2022 पर्यंत हा मार्ग बांधून पूर्ण होणार आहे.

पुन्हा भुयारी मेट्रो..
3.2 कि.मी.लांबीच्या अंधेरी – आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल -2 या मेट्रोच्या मार्गिकेचा 2.11 किलोमीटरचा पट्टा हा भुयारी असणार आहे. त्यामुळे एक स्थानक देखील भुयारी असणार आहे.

दहिसर ते मीरा भाईंदर एलिव्हेटेड मार्ग
मार्गाची एकूण लांबी – 13. 58 किमी
एकूण स्थानके – 11
कुलाबा – वांद्रे -सीप्झ मेट्रो -3 देखील 2022 पर्यंत पूर्ण होणार आहे.

अंधेरी ते आंतरराष्ट्रीय विमानतळ एलिव्हेटेड व भुयारी मार्ग
एकूण स्थानके 11 त्यातील 1 स्थानक भुयारी
प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख – मार्च 2022
दोन्ही प्रकल्पांचा खर्च – 6607 कोटी रु.

किमान 10 कमाल 80 रुपये तिकीट प्रवासी भाडे
0ते 3 कि.मी.-10 रु.
3 ते 12 कि.मी. -20 रु.
12 ते 18 कि.मी. -30 रु.
18 ते 24 कि.मी. -40 रु.
24 ते 30 कि.मी. – 50 रु.
30 ते 36 कि.मी. – 60 रु.
36 ते 42 कि.मी. – 70रु.
42 कि.मी.पेक्षा अधिक अंतर- 80 रु.

summary- metro 9 and metro 7 got permission

आपली प्रतिक्रिया द्या