
कोरोनामुळे इतर व्यवहार बंद असले तरी मुंबईतील विकासकामे थांबलेली नाहीत. ती आणखी वेगाने होत आहेत. मुंबईतील महत्त्वाकांक्षी भुयारी मेट्रो प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे.
अंधेरी मरोळ येथे भुयारी मेट्रो मार्गावर रूळ बसवण्याचे काम करताना कर्मचारी दिसत आहेत. जमिनीपासून 26 मीटर खाली हे काम सुरू आहे. 33.5 किलोमीटरच्या या भुयारी मेट्रोमार्गासाठी 54.5 किलोमीटरचे रूळ टाकणे आवश्यक आहे. आतापर्यंत त्यातील 50 किलोमीटरपर्यंत रूळ टाकले गेले आहेत. भुयारीकरणाचे काम 98 टक्के तर बांधकाम 78 टक्के पूर्ण झाले आहे.





























































