
आरेतील मेट्रो कारशेड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोड तत्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर मेट्रोला चांगलाच झटका मिळाला आहे. पण, या सुनावणीच्या आदल्या दिवशी मुंबई मेट्रोने एक ट्वीट केलं आहे, ज्यात 24 हजार झाडं लावल्याचा दावा केला आहे. सुनावणीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या ट्वीटमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगल्या आहेत.
मुंबई मेट्रो-3च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून 24 हजार झाडं लावल्याचा दावा करण्यात आला आहे. यात आरेही समाविष्ट असल्याचं मेट्रोचं म्हणणं आहे. या झाडांमध्ये कदंब, बेहडा सहित अन्य काही उपयुक्त झाडांची लागवड केल्याचं मेट्रोने या ट्वीटमधून सांगितलं आहे. यात सहा ते 12 इंच, 12-15 इंचांच्या झाडांचा समावेश आहे. या झाडांची योग्य ती निगा राखली जात असून गेल्या दोन वर्षांची ही मेहनत असल्याचंही मेट्रोचं म्हणणं आहे.
Promises kept Commitments delivered. #MMRC has planted arnd 24,000 trees across Mumbai including #AareyMilkColony and degraded areas of #SGNP. Sturdy native species like Behada,Kadamb, Karanj etc 6 – 12 inch girth & 12-15 ft height planted. 2 years efforts and results show up. pic.twitter.com/iXtCFb43wj
— MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) October 6, 2019
सोमवारी सुनावणी ठेवल्यानंतर रविवारी संध्याकाळी हे ट्वीट आल्याने चर्चेला उधाण आलं आहे. काही नेटकऱ्यांनी या ट्वीटला समर्थन केलं आहे, तर कित्येकांनी याचा विरोध केला आहे.






















































