
एमजी मोटर इंडियाने आज एमजी हेक्टरचे ‘शाईन’ व्हेरिअंट हिंदुस्थानात लॉन्च केले आहे. हेक्टरच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त हेक्टरचे ‘शाईन’ व्हेरिअंट लॉन्च करण्यात आले आहे. आज आपण याच कार बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
फीचर्स
हेक्टर ‘शाईन व्हेरिअंटमध्ये सर्वात नवे इलेक्ट्रिक सनरुफ, 17-इंच अलॉय व्हील्स आणि 26.4 सेमी एचडी टचस्क्रीन एव्हीएन सिस्टिम, अॅपल कार प्लेसह आणि अँड्रॉइड ऑटो या सुविधा आहेत. तसेच शाइन सीव्हीटीमध्ये इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, पुश बटण स्टार्ट/स्टॉप आणि स्मार्ट एंट्री, क्रोम डोअर हँडल आणि टेलिस्कोपिक स्टिअरिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहे.
या कारच्या खरेदीवर एमजी एक निवडक अॅक्सेसरीजचे पॅकेजदेखील देत आहे. यात लेदरेट सीट कव्हर्स आणि स्टीअरिंग व्हील कव्हर, विंडो सनशेड्स, एअर प्युरिफायर, वायरलेस फोन चार्जिंग आणि थ्री डी केबिन मॅट्स आकर्षक किंमतीच्या ऑफरवर असतील. या कारला एमजी शील्ड इन्शुरन्सदेखील असेल. याअंतर्गत 5-5-5 ऑफर तसेच पाच वर्षांची अमर्याद किलोमीटरची वॉरंटी, पाच वर्षांचे रोडसाइड असिस्टन्स आणि पाच वर्षांची लेबर फ्री सर्व्हिस यांचा समावेश आहे.
इंजिन
कंपनीने यात 1.5 लिटर टर्बो पेट्रोल, 2.0 लिटर डिझेल इंजिन आणि पेट्रोल इंजिनसह माईल्ड हायब्रिड तंत्रज्ञान देण्यात आले आहे. यात मॅन्युअल आणि ऑटोमॅटिकचा पर्याय देण्यात आला आहे. हेक्टर शाईनला पेट्रोल मॅन्युअल, पेट्रोल सीव्हीटी आणि डिझेल मॅन्युअलसह उपलब्ध केले आहे.
किंमत
कंपनीने या कारची किंमत 14.51 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी ठेवली आहे.




























































