बिल गेट्स यांना कोरोना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. मी स्वतःला आयसोलेट केले आहे. मी कोरोनाचे दोन डोस घेतले आहेत. त्याचबरोबर मी बूस्टरदेखील घेतला आहे. मला चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. चिंतेचे कारण नाही, असे त्यांनी ट्विट केले आहे. दरम्यान, गरीब देशांमध्ये ते लोकांसाठी लस आणि औषधे उपलब्ध करून देण्याचे काम करत आहेत.