
झोपेचा आणि न्यूरोलॉजिकल रोगाचा काय संबंध आहे? या विषयाशी संबंधित संशोधन करत असताना, तज्ञांना असे आढळले की जर दररोज झोपेत सतत अडचण येत असेल तर एखाद्या व्यक्तीला मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. न्यूरोलॉजी जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनानुसार, जर एखाद्या व्यक्तीला अंथरुणावर झोपल्यानंतरही आठ तास झोप येण्यास अडचण येत असेल, तर त्या व्यक्तीला मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. आठ तास झोप न लागल्याने हे गरजेचं नाही आहे की, त्याला सकाळी उठताच डोके दुखीचा त्रास होऊ शकतो. मात्र त्याला एक ते दोन दिवसानंतर डोके दुखीचा त्रास होऊ शकतो.
ब्रिघम आणि व्हिमिन हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि संशोधक सुजैन बेर्टिश याबाबत बोलताना म्हणाल्या की, ‘झोप आणि मायग्रेनशी संबंधित संशोधनात असे दिसून आले आहे की, व्यवस्थित झोप न आल्यास त्याचा त्रास लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला जाणवला नाही. तर तुम्हाला काही दिवसांनंतरही त्याचा त्रास होऊ शकतो. मी बहुतेकदा मायग्रेनच्या रूग्णांना भेटते. ज्याच्या निद्राच्या समस्येचा मी उपचार करते. झोपेच्या समस्या असलेल्या रूग्णांवर उपचार करणाऱ्या तज्ञांना मायग्रेनच्या जोखमीपासून आपल्या रूग्णांचे संरक्षण कसे करावे, याचे मोठे आव्हान आहे. मात्र यावर अजूनही योग्य उपचार पद्धती उपलब्ध नाही आहे.
दरम्यान, संशोधित ही गोष्ट सिद्ध झाली आहे की, पूर्ण झोप न झल्यास दुसऱ्या दिवशी मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. हा त्रास टाळण्यासाठी रात्री झोपेत अडथळा आणू शकणार्या प्रत्येक गोष्टीपासून स्वत: ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

























































