दुधाची मागणी 30 लाख लिटरने घसरली, लॉकडाऊनच्या भीतीने वितरकांनी हात आखडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना महामारीच्या दुसऱया लोटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊनचे वारे वाहत असून त्याचा मोठा फटका दूध उत्पादकांना बसला आहे. राज्यात दररोज जवळपास सवा कोटी लिटर दूधाचे वितरण होते. मात्र लॉकडाऊनच्या भीतीमुळे दूध वितरक आणि विव्रेते दुधाची मागणी नोंदवताना हात आखडता घेत आहेत. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत दुधाची मागणी 20-25 टक्क्यांनी म्हणजे जवळपास 30 लाख लिटरने घसरली आहे.

लॉकडाऊनच्या भीतीने महाराष्ट्रात असलेल्या परराज्यांतील मजुरांनी घराची वाट धरली आहे. तसेच दुधाची मोठी मागणी असलेल्या मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यातील नागरिकांनी लॉकडाऊनच्या भीतीने आपल्या गावचा रस्ता धरला आहे. तसेच परराज्यातून आलेले मजूरही मोठय़ा संख्येने घरी परतत आहेत.

त्याचा थेट परिणाम दुधाच्या दैनंदिन मागणीवर झाला आहे. दररोज राज्यभरात एक कोटी 25 लाखांहून अधिक पिशवी बंद दुधाची विक्री होते, तर केवळ मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात जवळपास 50 लाख लिटर दुधाचे वितरण होते. मात्र लॉकडाऊन लागण्याची शक्यता असल्याने नेहमी एवढय़ाच दुधाची मागणी नोंदवल्यास दूध खराब होऊन आर्थिक नुकसान होईल या भीतीने वितरक आणि विव्रेत्यांकडून कमी मागणी नोंदवली जात असल्याचे महाराष्ट्र मिल्क प्रोडय़ुसर अॅण्ड प्रोसेसर असोसिएशनचे सरचिटणीस प्रकाश कुतवळ यांनी स्पष्ट केले आहे.

दुधाच्या खरेदी दरावर परिणाम

राज्यात सध्या दररोज एक कोटी 40 लाख लिटरपर्यंत दुधाचे उत्पादन होते. त्यापैकी जवळपास सवा कोटी लिटर दुधाची थेट विक्री होत असून उर्वरित 15 लाख लिटर दूध दही, ताक, लस्सी या सह उत्पादनांबरोबरच दूध पावडर तयार करण्यासाठी वापरले जाते. मात्र सध्याच्या दूध उत्पादनाचा विचार करता 30 लाख लिटरहून अधिक दूध दररोज शिल्लक राहणार आहे. त्यामुळे शेतकऱयांकडून खरेदी केल्या जाणाऱया दुधाचा दर घसरण्याची भीती व्यक्त होत आहे.