
सामना ऑनलाईन। मुंबई
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या दूधदर आंदोलनाला यश आले आहे. सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान देण्याची मागणी मान्य केली आहे. दुधाला आता २५ प्रतिलिटर भाव मिळणार आहे आहे. दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी ही घोषणा केली आहे.
#Maharashtra government announces Rs 25 per liter as the minimum rate of milk for dairy farmers, following state-wide protests over the demand. The decision will be implemented from July 21. pic.twitter.com/D6PaV4w9Fb
— ANI (@ANI) July 19, 2018
दूध महासंघाने शेतकऱ्यांना २५ रुपये प्रतिलिटर भावा द्यावा. सरकार दूध संघांना ५ रुपयांचे अनुदान देईल. दूध महासंघाला २५ रुपयांपेक्षा कमी भाव देता येणार नाही असे सरकारने निक्षून सांगितलं आहे. २१ जुलैपासून हा निर्णय लागू होणार आहे.
गुरुवारी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये दूध दरवाढीसंदर्भात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, काँग्रेसचे जेष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांच्यासह दूध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. याच बैठकीमध्ये पाच रुपयांचे अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.






























































