
बंद पडलेल्या एनटीसी गिरण्या तसेच गिरण्यांच्या चाळींची पुनर्बांधणी आदी प्रश्नावर येत्या 27 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया विधिमंडळाच्या अधिवेशनावेळी गिरणी कामगारांचा भव्य मार्च काढून झोपलेल्या सरकारला जाग आणली जाईल, असा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, शिवसेना उपनेते-आमदार सचिन अहिर यांनी दिला. टाटा मिल कामगारांच्या आक्रोश आंदोलनात ते बोलत होते.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाद्वारे गुरुवारी काळाचौकी येथील इंडिया युनायटेड मिल नंबर 5, एन. एम. जोशी मार्गावरील पोदार, लालबाग येथील दिग्विजय आणि दादर येथील टाटा या बंद एनटीसी गिरण्यांवर संतप्त कामगारांनी हल्लाबोल मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.






















































