
बिनविरोध निवडणुका हे प्रगल्भतेचे लक्षण आहे. एखाद्या विरोधी पक्षातील कार्यकर्त्यास असे वाटले की, सत्तेतील नगरसेवकामुळे आपल्या भागाचा विकास होईल म्हणून त्याने माघार घेतली तर ते चांगलेच आहे. विकासासाठी बिनविरोध निघणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विकासवेगातून हे दिसून आले आहे, असे मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील जागा असू द्या किंवा कल्याणमध्ये, जिथे बिनविरोध नगरसेवक निवडणुका झाल्या तिथे महायुती एकमेकांसमोर लढणार होती. दोन्ही बाजूला आमचीच मंडळी होती. जर प्रत्येक वॉर्डातील आणि प्रभागातील स्थिती पाहिली तर तिथे विरोधक कोणी नव्हतेच. त्यामुळे या निवडणुका बिनविरोधी झाल्या. हे प्रगल्भतेचे लक्षण आहे. विकासाचा वेग वाढविण्यासाठी असे घडणे चांगले असते, असे समर्थनही बावनपुळे यांनी केले.


























































