वन्य प्राण्याच्या उपद्रवामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा द्या – क्षीरसागर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

रान डुक्कर आणि हरिणामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभ्या पिकांची नासाडी या वन्य प्राण्याच्या उपद्रवामुळे झाली होती.उभे पिके उद्धवस्त करण्याचे काम वन्य प्राण्यांनी केले आहे.वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात यावा अशी मागणी रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये केली.

मंगळवारी झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत रोहयो फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात अनेक समस्या आणि अडचणी समोर आणत मंत्री मंडळांचे लक्ष केंद्रीत केले. शेतकऱ्यांच्या मागण्या मंडत असतांना त्यांनी वन्य प्राण्याच्या उपद्रवामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात यावा ही मागणी प्रामुख्याने उपस्थित केली. तेम्हणाले हरीण आणि रानडुकरांनी बीड जिल्ह्यात थैमान घातले आहे. त्यांनी उभी पिके उद्धवस्त केली आहेत. शेतकऱ्यांवरसुद्धा हल्ले झाले आहेत.अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर वन्य प्राण्यांच्या उपद्रवाचे नवे संकट निर्माण झाले आहे. यांचा उपद्रव ही एक आपत्ती झाली आहे.त्याचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. त्यासाठी या नुकसानीची भरपाई पिक विम्याच्या माध्यमातून देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.