
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथे खेळताना विहिरीत पडून अल्पवयीन मुलाचा बुडून मृत्यू झाला. महमद युनुस चाँद साली (16, मूळ रा. तेनहल्ली जि. विजापूर, कर्नाटक सध्या रा. शेट्येनगर, रत्नागिरी) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
शनिवारी दुपारी 2 वा. सुमारास महमदने आपल्या आईला, मी मिरकरवाडा येथे खेळण्यासाठी जात असल्याचे सांगून तो घरातून बाहेर पडला होता. दरम्यान, शनिवारी दुपारी 3.15 वा.खबर देणार यांच्या चुलत सासऱ्याने त्यांना फोन करुन महमदचा मिरकरवाडा येथील विहिरीमध्ये पडल्याचे सांगितले. महमदच्या आईने तातडीने त्याठिकाणी जाउन उपचारासाठी महमदला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले




























































