
दिल्लीमध्ये काही मवाली एका तरुणीची छेड काढत होते, तेव्हा तिच्या भावाने त्यांचा विरोध केला. तेव्हा मवाल्यांनी मुलाला मारहाण केली इतकेच नाही तर त्याच्या पोटात सुरा खुपसला. या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
प्रकाश आणि प्रिती हे दोघे बहीण भाऊ सर्वोदय विद्यालयात शिकत होते. प्रकाश दहावीला असून प्रिती 12 वीला आहे. शाळा सुटल्यानंतर दोघेही घरी जात होते. तेव्हा काही गुंड-मवाल्यांनी प्रितीची छेड काढायाला सुरुवात केली. तेव्हा प्रकाशने त्यांना विरोध केला. तेव्हा या मवाल्यांनी प्रकाशला मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी प्रकाशच्या पोटात सुरा खुपसला आणि पळ काढला.
प्रकाशला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.





























































