मराठा आरक्षणासाठी मुलीची आत्महत्या, दशक्रिया विधीदिवशी ग्रामस्थांनी पाळला बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नगर

मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या एका १६ वर्षीय मुलीच्या दशक्रिया विधीनिमित्त नगर येथील गावाने बंद पाळला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून कापुरवाडी येथील किशोरी काकडे या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या दशक्रिया विधीला संपूर्ण कापुरवाडी गावाने कडकडीत बंद पुकारला. तिच्या दशक्रिया विधीला ग्रामस्थांनी आणि शालेय विद्यार्थिनींनी किशोरीला सामूहिक श्रद्धांजली वाहिली.

अकरावीत शिकणाऱ्या किशोरीने चांगले गुण मिळवूनही अनूदानीत तुकडीत प्रवेश मिळाला नाही, केवळ मराठा समाजात जन्माला आल्याने आपल्यावर ही वेळ का आली? असे म्हणत मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी वसतिगृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये मराठा अरक्षणासाठी माझे बलिदान देत असल्याचे तिने म्हटलं होतं.

किशोरीला 89 टक्के गुण मिळाले असूनही अनुदानित तुकडीत प्रवेश मिळू शकला नव्हता. चांगले गुण असूनही विनाअनुदानित तुकडीत प्रवेश घ्यायला लागल्याने तिला ८ हजार रुपये भरावे लागले होते. केवळ मराठा समाजात जन्म घेऊन आणि मराठ्यांचा महाराष्ट्र असूनही मराठ्यांवर अशी वेळ आली. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी बलिदान देत आहे, असं तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटलं होतं.

summary- minor committed suicide villagers call for strike