
अल्पवयीन आरोपीला अटक अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱया अल्पवयीन मुलाच्या गुन्हे शाखा युनिट-7 मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी मुलाने अशा प्रकारचा गुन्हा यापूर्वी देखील केला होता.
कुर्ला पश्चिमेकडील विनोबा भावे नगरातुन एका 11 वर्षाय मुलीचे अपहरण झाले होते. हा गुन्हा गंभीर असल्याने युनिट-7 चे प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक आरोपीचा शोध घेऊ लागले. तेव्हा सदर मुलगी सूर्योदय नगर येथील एका झोपडीत असल्याची माहिती पोलिस अधिकारी निधी धुमाळ यांना मिळाली. त्यानुसार पथकाने ती झोपडी गाठून त्या मुलीसह अपहरणकर्त्याला ताब्यात घेतले. तुझे आईवडील घाटकोपर चौकीजवळ असल्याचे सांगून आरोपी तिला कुर्ल्यावरून घाटकोपरला घेऊन गेला. मग त्याने एका झोपडीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला, असे तपासात समोर आले. तसेच आरोपीने याआधीसुद्धा अशा प्रकारचा गुन्हा केला होता. त्या गुन्हात अटक झाल्यानंतर तो दोन महिने बालसुधारगृहातदेखील होता.






























































