
सामना ऑनलाईन । अलिगढ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला मुसलमानांकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमधील अलिगढ येथे शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. मनीष असं या मुलाचं नाव आहे.
जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, अकरावीत शिकणारा मनीष शुक्रवारी दुपारी संघाच्या शाखेत गेला होता. सायंकाळी तिथून परतत असताना त्याला वाटेत मुसलमानांची वस्ती लागली. त्या वस्तीतील एका ढाब्यावर बसलेल्या एका टोळक्याने मनीषच्या संघ गणवेशावरून त्याची टर उडवायला सुरुवात केली. मनीषने विरोध केल्यानंतर त्या टोळक्याने त्याला मारहाण करायला सुरुवात केली. पेटत्या लाकडाने त्याला मारहाण करत असताना त्या टोळक्याने पुन्हा त्यांच्या वस्तीत न येण्याविषयीही धमकावलं. कशीबशी सुटका करत त्याने पोलिसात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मनीष याचीही वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून संबंधित प्रदेशातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही पडताळणी केली जात आहे.

























































