बस मर्जी हमारी होगी, मिर्झापूर – 2 चा दमदार टीजर प्रदर्शित

822

ऍमेझॉन प्राईम वरील मिर्झापूर या वेबसीरीजचा दुसर्‍या सीजनचा टीजर प्रदर्शित झाला आहे. जो आया है वो जाएगा भी, सिर्फ मर्झी हमारी होगी असं खणखणीत वाक्य कालिन भैय्याच्या आवाज या टीजरमध्ये ऐकू येतो.

मिर्जापूरच्या पहिल्या भागात बबलू आणि गुड्डूची बायको स्विटीचा मृत्यू झाला आहे. या सगळ्यात गुड्डू आणि मुन्ना वाचले आहेत. आता गुड्डू, मुन्ना आणि कालिन या तिघांमधील युद्ध आगामी सीझनमध्ये पाहायला मिळणार आहे. सेक्रेड गेम्सच्या दुसर्‍या पर्वानंतर प्रेक्षकांना मिर्झापूरच्या दुसर्‍या सीझनची आतुरता होती. मिर्झापूरचा नवीन टीझर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

मिर्झापूरमध्ये सर्वात लोकप्रिय कॅरेक्टर म्हणजे कालिन भैय्या. म्हणजेच पंकज त्रिपाठी. सेक्रेड गेम्समध्ये पंकज त्रिपाटी यांनी गुरुजीची भुमिका साकारली होती. नव्या सीझमध्ये कालिन भैय्या आपल्या मिर्झापूरवर पुन्हा वर्चस्व कसे मिळवणार, गुड्डू आणि मुन्नाशी ते कसे वागणार हे प्रश्न आहेत. या सगळ्यात तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे रती शंकर शुक्लाचा गुड्डूने खून केला आहे. त्याचा मुलगाही या ‘व्यवसायात’ उतरला असून तो बापाचा बदला कसा घेणार या प्रश्नाचे उत्तर या सीझनमध्ये मिळण्याची शक्यत आहे.

सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पहावी लागणार आहे. 2020 मध्ये हा सीझन प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या