
परळीतील श्री वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मंदिरातील सुरक्षारक्षकांच्या मुजोरपणामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना रांगेच्या नावाखाली मंदिरातील सुरक्षा रक्षक दमदाटी करत आहेत. तर ते काहींना थेट प्रवेश देत आहेत. त्यामुळे भाविक त्रस्त झाले असून मंदिर व्यवस्थापनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी सुरक्षा रक्षक मुजोरी करत आहेत. अशा सुरक्षा रक्षकांवर श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टने कारवाई करावी, अशी मागणी काही भाविकांनी केली आहे. या आधीही मंदिरातील सुरक्षारक्षकांच्या अनेक तक्रारी भाविकांनी देवस्थान ट्रस्टकडे आल्या आहेत. सततच्या या घटनांमुळे भाविकांत नाराजी वाढत आहे. याकडे मंदिर प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.



























































