
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिवंगत अजित अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या चौकशीवरून पुन्हा एकदा सरकार आणि तपास यंत्रणांना धारेवर धरले आहे. या प्रकरणातील VSR या विमान कंपनीच्या कार्यपद्धतीवर आणि ३००० तासांच्या रेकॉर्ड्स गायब असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
X वर एक पोस्ट करत रोहित पवार यांनी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, “VSR कंपनीकडे संबंधित विमानाच्या ५००० तासांच्या उड्डाणापैकी केवळ १८०० ते २००० तासांचेच रेकॉर्ड उपलब्ध आहेत. उर्वरित ३००० तासांचे रेकॉर्ड्स उपलब्धच नसल्याचे समोर येत आहे.” या मिसिंग रेकॉर्डमध्ये हेराफेरी करण्यासाठी आणि चौकशीला बगल देण्यासाठी जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केला जात आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या अपघाताच्या संदर्भात काल रोहित सिंग याला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यावर आक्षेप घेत रोहित पवार म्हणाले की, “महाराष्ट्राचा मोठा लोकनेता अपघातात गेला असताना, अपघाताला जबाबदार असलेल्या कंपनीच्या मालकाला केवळ पायलट म्हणून चौकशीसाठी बोलावले जाणे, हे संशयास्पद आहे. यामागे नेमका हेतू काय?”
अजित पवार यांच्या मृत्यूचा तपास एकीकडे सीआयडी करत असताना, दुसऱ्या बाजूला DGCA ने कंपनी मालकाच्या आगमनाबाबत कोणतीही माहिती सीआयडीला का दिली नाही, यावरही त्यांनी बोट ठेवले आहे.
“DGCA आणि VSR ची मिलीभगत आणि यंत्रणांमधील विसंवाद पाहता, या यंत्रणांच्या लेखी अजित दादांच्या आयुष्याची नेमकी किंमत काय? केंद्र आणि राज्य सरकारने यात तातडीने गांभीर्य दाखवणे अपेक्षित आहे,” असेही रोहित पवार यांनी नमूद केले.
स्व.अजित दादांच्या अपघातातील विमानाच्या चौकशीच्या निमित्ताने रोहित सिंगला काल पायलट म्हणून चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती मिळत असून काल रोहित सिंग देशात आला होता. तसेच VSR कडे विमानाच्या ५००० तासांपैकी केवळ १८०० ते २००० तासांचा रेकॉर्ड उपलब्ध असून उर्वरित ३००० तासांचे…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 24, 2026






























































