Mission Begin again – शुक्रवारपासून मार्केट , मंडई सुरू

मीशन बिगीन अगेन अंतर्गत शुक्रवार 5 जूनपासून सकाळी 9 ते 5 या वेळेत एक दिवसाआड मार्केट सुरू करण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. मात्र व्यापारी आणि ग्राहकांना सोशल डिस्टंन्सचे नियम पाळावे लागणार आहेत. याबाबत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नव्या गाईडलाइन्सचे परिपत्रक आज जारी केले आहे.

राज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्यात त्या त्या विभागातील रुग्णसंख्या लक्षात घेऊन लॉकडॉऊन टप्प्याटप्प्याने खुला करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. यामध्ये ग्राहकांना ट्रायल, एक्सेंजची सुविधा राहणार नाही. शिवाय सोशल डिस्टंन्स नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास तातडने संबंधित दुकान, मार्केट बंद करण्यात येईल. याशिवाय टॅक्सी, कॅब आणि रिक्शा प्रवासी, फोर व्हिलर ‘वन प्लस टू’ अशी व्यवस्था राहील.

असे आहेत नियम
* रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेली दुकानं सोमवार, बुधवार, शुक्रवार तर रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेली दुकानं मंगळवार, गुरुवार, शनिवार अशी एक दिवसाआड सुरू ठेवण्याची परवानगी असेल.

* सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या वेळेतच सोमवार ते शनिवार एक दिवसाआड दुकान सुरू राहतील मात्र रविवारी सर्व दुकानं बंद ठेवणे बंधनकारक असणार आहे.

* कपड्याच्या दुकानांमधील ट्रायल रूम वापरण्यास , कपडे परत करण्यास परवानगी नाही. त्याच बरोबर दुकानांमध्ये सोशल डिस्टन्स पाळणे
बंधनकारक असेल.

* नियम मोडल्यास दुकानदाराला त्याचे दुकानं तात्काळ बंद करण्यास भाग पाडण्यात येईल.

* नियमाची काटेकोर अंमलबजावणीची सहायक आयुक्तांवर असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या