जीएसटी प्रमाणपत्राचा गैरवापर; सोन्याच्या दागिन्यांची ठकवणूक करणारा गजाआड

प्रसिद्ध ज्वेलर्स चंदूकाका सराफ यांना आंतरराष्ट्रीय हिरे परिक्षण संस्थेतून बोलत असल्याचे भासवून भामटय़ाने कांड केला. भामटय़ाने चंदूकाका सराफ यांचे जीएसटी प्रमाणपत्र अपटेड करण्याच्या बहाण्याने मिळवले मग त्याआधारे दोन पंपन्यांकडून 31 लाख 58 हजार रुपयांचे दागिने घेणाऱ्या एका आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी पकडले.

चंदूकाका सराफ यांना एकाने संपर्क साधून तो आंतरराष्ट्रीय हिरे परिक्षण संस्थेतून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने  चंदूकाका सराफ यांचे जीएसटी प्रमाणपत्र अपटेड करण्याच्या बहाण्याने ते मिळवले. मग आरोपीने सोन्याचे दागिने बनविणाऱ्या  पंपन्यांशी संपर्क साधून तो चंदूकाका सराफ असल्याचे सांगितले. त्यांना आणखी दोन नवीन सोन्याच्या दागिन्यांचे शोरूम उघडायचे असून त्या शोरूममध्ये ठेवण्यासाठी सोन्याचे दागिने आवश्यक असल्याचे सांगून त्याने ऑर्डर दिल्या. आरोपीने मनी ज्वेल्स एक्सपर्ट विथ बेटर डायमंड यांच्याकडून 27 लाख किंमतीचे तर दुसरी पंपनी कलीस्ता ज्वेलर्स यांच्याकडून चार लाख 58 हजार किंमतीचे सोने व डायमंड ज्वेलरी कुरिअर मार्फत मागवून ते स्विकारले होते. या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रविंद्र वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कसून तपास करीत आरोपीला पकडले.त्याच्याकडून गुह्यातील सर्व ऐवज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.