पाच वर्षांची गायिका यूटय़ूब सुपरस्टार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मिझोरमची चिमुरडी यूटय़ूब सुपरस्टार बनली आहे. एस्टर हनामते असे तिचे नाव असून तिच्या आवाजाने साऱयांना भुरळ पाडली आहे. दोन वर्षांपूर्वी तिने वंदे मातरम हे गीत गायले होते. तेव्हापासून यूटय़ूबवर ती राज्य करत आहे. तिच्या वंदे मातरम गीताला आता नवा रेकॉर्ड केलाय म्हटल्यास वावगे ठरणार नाही. या गीताला आतापर्यंत यूटय़ूबवर 1.3 कोटीहून अधिक ह्यूज मिळाले आहेत.

मिझोरमच्या लुंगलेई जिह्यातील एस्टर हनामते अवघ्या पाच वर्षांची आहे. एवढय़ा लहान वयात तिच्या यूटय़ूब ऑफिशियल पेजवर साडेपाच लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या गाण्याचे अनेक व्हिडीओ अपलोड झालेले आहेत. यामध्ये सगळ्यात जास्त चर्चा आहे, ‘वंदे मातरम’ गीताची. या व्हिडीओला 1.3 कोटी नेटिझन्सने बघितले आहे. प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांच्या मूळ गीताचा हा रिमेक 2020 साली करण्यात आला होता. यामध्ये शाळेच्या मैदानात एस्टर हाती तिरंगी धरून ‘वंदे मातरम’ गाताना दिसते. या गीताला पंतप्रधान नरेंद्री यांनीही रिट्विट केले होते. त्यानंतर तिने राष्ट्रगीत गायले होते. या दोन्ही गीतांव्यतिरिक्त एस्टरच्या प्रत्येक गीताला लाखो ह्यूज मिळाले आहेत.