आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी भालके यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. कालांतराने ते कोरोनामुक्त होऊन घरीही परतले. मात्र, किडनीच्या आजाराने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती अतिशय खालावली असून शरीर उपचाराला साथ देत नसल्याने त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.