
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदान पार पडलं. गुरुवारी निकाल जाहीर होईल. मात्र याआधीच एक मोठी बातमी आली आहे. वसई-विरार मतदार संघाचे आमदार हितेंद्र ठाकूरांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. पुढची कोणतीही निवडणूक लढणार नाही, असे त्यांनी मंगळवारी जाहीर केले.
हितेंद्र ठाकूर हे निवडणूक लढवणार नसले तरी मात्र राजकारणातून त्यांनी संन्यास घेतलेला नाही. राजकरणात सक्रिय राहणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यंदा हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात शिवसेनेने प्रदीप शर्मा यांना उतरवून तगडे आव्हान दिले आहे. मात्र निकाल जाहीर होण्याआधीच हितेंद्र ठाकूर यांनी पुढली निवडणूक नसल्याचे जाहीर केले आहे.



























































