आमदार राजन साळवी यांची एसीबी कार्यालयात चार तास चौकशी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आमदार राजन साळवी यांची आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात चार तास चौकशी करण्यात आली.

आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांची पत्नी अनुजा साळवी आणि मुलगा शुभम साळवी यांच्यावर जानेवारी महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आमदार राजन साळवी यांना त्यांचे मोठे बंधू दीपक साळवी यांच्यासोबत चौकशीला बोलावले होते. आमदार राजन साळवी यांची पत्नी अनुजा साळवी आणि मुलगा शुभम साळवी यांचाही चौकशी करण्यात आली होती.

मंगळवारी पुन्हा आमदार राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात चौकशी करण्यासाठी बोलावले होते. आज त्यांची चार तास चौकशी करण्यात आली. पत्नी अनुजा साळवी आणि मुलगा शुभम साळवी यांच्या व्यवसायाबद्दल माहिती विचारण्यात आली.