
सामना ऑनलाईन । भोपाळ
मध्यप्रदेशमध्ये कोलार भागात दसऱ्यानिमित्त आयोजित रावण दहनाच्या कार्यक्रमाच्यावेळी परदेशी तरुणींचा अश्लील डान्स देखील चालू असल्याचे समोर आले आहे. यावेळी भाजपचे आमदार रामेश्वर शर्मा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. आमदारांसमोरच हा डान्सचा कार्यक्रम सुरू होता, अशी चर्चा रंगल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
दसऱ्याच्या दिवशी रामेश्वर शर्मा हे कोलार भागातील बंजारी दसरा मैदानावर रावण दहनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हायला गेले होते. त्यावेळी तिथे स्टेजवर काही परदेशी तरुणी डान्स करत होत्या. यावरून काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. ‘भाजप आमदार ज्या धार्मिक कार्यक्रमात गेले होते तिथे मुली नाचवल्या जात होत्या. अशा प्रकारे धर्माचा अपमान करणाऱ्या भाजपच्या नेत्यावर कारवाई झाली पाहिजे’ अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते भुपेंद्र गुप्ता यांनी केली.
























































