मिंधे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी 15 ऑगस्ट रोजी आपले सुपुत्र मृत्युंजय गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या रात्री तलवारीने केक कापून आपल्या पत्नी व परिवाराच्या सदस्यांना केक भरविला होता. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर बुलढाणा शहर पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी शस्त्र प्रदर्शन केल्या प्रकरणी मुंबई पोलीस कायदा 135 अन्वये कलम 37 (1) (3) नुसार आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक बी. बी. महामुनी यांनी दिली आहे.