
महायुती सरकारने केलेल्या हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याला विरोध केल्यानंतर तो जीआर सरकारला मागे घ्यावा लागला. त्यानंतर उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे तब्बल 20 वर्षानंतर एकत्र एका मंचावर आले. त्यामुळे मिंधेंचा थयथयाट सुरू झाला आहे व त्याच रागात मिंधेचे आमदार संजय गायकवाड यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
हिंदी सक्तीचा जीआर मागे घेण्याविषयी पत्रकारांनी संजय गायकवाड यांना विचारताच ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या मग ते काय मूर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराज महाराणी ताराराणी, जिजाऊँ हे सर्व बहुभाषिक होते. ते काय मूर्ख होते का जे त्यांनी इतक्या भाषा शिकल्या. त्यामुळे भाषेवरून वाद करणं चुकीचं आहे, असं संजय गायकवाड म्हणाले.
संजय गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेल्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावरून नेटकरी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करत आहेत.