
मुंबईतील वाढती वाहनांची संख्या आणि रस्त्यावर विनावापर पडून राहणाऱ्या वाहनांचा खच पाहता भविष्यात या भंगार वाहनांचा प्रश्न बिकट होणार आहे. एमएमआरडीए अशा वाहनांना क्रॅप म्हणजे मोडीत काढण्यासाठी ‘क्रॅप सेंटर’ उभारणार आहे. मुंबईतील हा पहिला प्रकल्प असेल.
देशामध्ये अशा प्रकारचा पहिला प्रकल्प नोएडाजवळ उभारण्यात आला आहे. तेथे पोलादाची पुनर्प्रक्रिया करणाऱ्या एका उद्योजकानेच हा प्रकल्प स्थापन केला असून ते ऑटोमोबाईल क्षेत्रातील जुन्या गाडय़ांना विकत घेऊन त्यांचे डी-रजिस्ट्रेशन करून लोखंडावर पुनर्प्रक्रिया करून कारखान्यांना विकतात. अशाच धर्तीवर एमएमआरडीएने ‘क्रॅप सेंटर’चा रोड मॅप तयार करण्यासाठी कन्स्लटंट नेमण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात बीकेसीत जागेची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.
2034पर्यंत 80 लाख वाहने!
रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मुंबई महानगर क्षेत्रात वाहनांची संख्या 30 लाखांवर पोहचली असून 2034 मध्ये ती 80 लाखांवर पोहचणार आहे. वाहनांना क्रॅपमध्ये काढता येणारी शास्त्रशुद्ध पद्धत नसल्याने हजारो वाहने रस्त्याच्या कडेला पडून रस्त्यांवर जागा व्यापली जाऊन वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळत आहे.

























































