
कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिका सहायक आयुक्तांसह अधिकाऱयांशी वाद घातल्याप्रकरणी मनसेचे संदीप देशपांडेंना शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
दिवाळीनिमित्त शिवाजी पार्क परिसरात कंदील आणि बॅनर लावण्यात आले होते. त्याविरोधात महापालिकेने कारवाई हाती घेतली होती. कारवाई सुरू असताना देशपांडेंनी सहायक आयुक्तांना फोन करून कारवाई थांबवण्यास सांगून शिवीगाळ केली. आज दुपारी देशपांडे यांच्यासह 7-8 जण परवानगी न घेताच सहायक आयुक्त कार्यालयात शिरले व कारवाईप्रकरणी सहायक आयुक्तांशी वाद घालून त्यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी सहायक आयुक्तांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी देशपांडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली व न्यायालयात हजर केले.





























































