संभाजीनगरमध्ये  नमाज पडण्यार्‍यांना हटकल्याने पोलिसांवर हल्ला, पोलीस गंभीर जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामूहिक नमाज पडण्यासाठी जमा झालेल्या लोकांना हटकल्यावरून पोलिसांवरच हल्ला केल्याची खळबळजनक घटना संभाजीनगरमध्ये घडली. यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी गंभीर झाले आहेत.

बिडकीन शहरातील संभाजीनगर मार्गावरील  अमिरनगर- प्रकाश नगर येथे मुस्लिम समाजातील काही लोकं धार्मिकस्थळी सामूहिक नमाज पडत असल्याची माहिती बिडकीन पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील हे कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी जाऊन नमाज पडणाऱ्या लोकांना विचारपूस करत असतानाच शेकडो महिला पुरुषांच्या जमावाने थेट हल्ला चढवत दगडफेक केली. यात पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, सहायक फौजदार बाबासाहेब दिलवाले, पोलीस नाईक सोनवणे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

दरम्याण बिडकीन पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेला नसुन 10 संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणारील फरार  आरोपींचा बिडकीन पोलीस कसून शोध घेत आहेत.