मॉब लिंचिंगला विरोध करणाऱ्या 50 जणांवरील देशद्रोहाचे गुन्हे मागे

406

देशातील मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांविरोधात आवाज उठवणाऱ्या 50 जणांवर दाखल केलेले देशद्रोहाचे गुन्हे अखेर बुधवारी मागे घेण्यात आले. तक्रारदाराच्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हणणे मुझफ्फरपूर पोलिसांनी मांडल्यानंतर न्यायालयाने संबंधित गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले. इतिहासकार रामचंद्र गुहा, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम, अनुराग कश्यप, अभिनेत्री अपर्णा सेन आदींचा गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये समाकेश होता. त्यांनी मॉब लिंचिंगबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. याचदरम्यान स्थानिक वकिलाच्या याचिकेवर सुनावणी करताना कनिष्ठ न्यायालयाने या 50 जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता तक्रारीत तथ्य नसल्याचे सिद्ध झाल्याने न्यायालयाने तक्रारदार वकिलावरच कारवाई करण्याचा आदेश दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या