
कळवा स्थानकावर लोकल ट्रेनमधील महिला डब्यात मोबाईलचा स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटात कुणीही जखमी झाले नाही. पण स्फोटाचा आवाज आणि धुरामुळे डब्यात गोंधळ उडाला
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी सांयकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी कळवा स्थानकावर सीएसएमटी कल्याण ही गाडी थांबली. तेव्हा महिलांच्या डब्यात एका महिला प्रवाशाचा मोबाईलचा स्फोट झाला आणि धूर निघाला. त्यामुळे संपूर्ण डब्यात एकच हलकल्लोळ माजला. धूर पसरल्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने अग्निशामक यंत्र वापरून आग विझवली. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. कुठलाही धोका नसल्याची खातरजमा केल्यानंतर लोकल सोडण्यात आली. या दरम्यान लोकल सेवा सुरळीत होती.































































