मोबाईल, लॅपटॉपच्या बॅटरीच्या शोधासाठी; तीन शास्त्रज्ञांना रसायनशास्राचे नोबेल

504

मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रीक व्हीकल यामध्ये वापरण्यात येणाऱ्या अत्यंत महत्त्वपूर्ण लिथीयम आयन बॅटरीच्या संशोधनासाठी तीन शास्त्रज्ञांना यावर्षीचा रसायन शास्त्रज्ञांचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

97 वर्षांचे अमेरिकेचे शास्त्रज्ञ बी. गुडइनफ यांच्यासह ब्रिटनचे स्टॅनली व्हिटिंघम आणि जपानचे अकिरा योशिनो यांना ‘नोबेल’ सन्मानित करण्यात येणार आहे. कमी वजन पण रिचार्ज करण्यासाठी अत्यंत पॉवरफुल असणाऱया लिथीयम आयन बॅटरीचा वापर मोबाईल, लॅपटॉपपासून इलेक्ट्रीक गाडय़ांमध्ये केला जातो. पेट्रोल-डिझेल मुक्त गाडय़ांचा वापर या संशोधनामुळे वाढला आहे. या तीन शास्त्र्ाज्ञांचे काम मोलाचे आणि प्रेरणादायी असल्याचे रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सने म्हटले आहे. या तिघा शास्त्र्ाज्ञांना संयुक्तपणे पुरस्कार देण्यात येईल.

आपली प्रतिक्रिया द्या