लातूरात मोबाईलचे दुकान फोडले, हजारोंचे मोबाईल लंपास

537

शहरातील अंबाजोगाई रोडवरील जे.के.मोबाईल एक्सेसरीज अ‍ॅण्ड मोबाईल रिपेअरींग सेंटर हे मोबाईलचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडले. दुकानातील सुमारे 60 हजार 821 रुपयांचे मोबाईल चोरट्यांनी पळवले.

या चोरी प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पठाण जुनेदखान रहीमखान यांनी तक्रार दाखल केली. रहीमखान यांच्या दुकानावरील पत्रा काढून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील साहित्याची पाहणी करुन दुकानातील 60 हजार 821 रुपयांचे मोबाईल चोरुन नेले. सकाळी दुकान उघडल्यानंतर दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले त्यानंतर सर्वत्र पाहणी केली असता दुकानाच्या वरील पत्रे उचकटलेले दिसून आले. अज्ञात चोरट्यांविरुध्द या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या